Napačna izbira? Nič za to! Izdelke lahko vrnete do 30 dni
Z darilnim bonom ne morete zgrešiti. Obdarovanec lahko v zameno za darilni bon izbere karkoli iz naše ponudbe.
Do 30 dni za vračilo
| माझे शालेय शिक्षण विदर्भामधे वाशीम इथे झाले. नंतर इंजिनियरिंग करता भोपाळला गेलो. १ वर्ष नाशिकला विमान कारखान्यात ओझर इथे नोकरी केली आणि नंतर पुण्याला सध्याच्या टाटा मोटर्स मध्ये रिटायरमेंट पर्यंत म्हणजे २००९ पर्यंत छान नोकरी झाली. | लिखाणाचा आणि माझा, किंवा वाचनाचा आणि माझा, नोकरीमधून निवृत्त होण्याच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत, घरी किंवा ऑफिस मधे, 'नाही' च्या आसपासच संबंध होता. नोकरीच्या शेवटच्या काळात मात्र आय एस ओ ९००० या स्टॅंडर्ड च्या निमित्ताने, माहिती नसणाऱ्या आणि जुजबी माहिती असणाऱ्या विषयांवर भरपूर म्हणजे प्रचंड लिखाण करण्याचा योग आला. बहुदा लिखाणाची हीच 'री',निवृत्तीनंतर अवांतर लिखाणात सुरु राहिली. | अगदी सुरवातीला वाचक वर्ग ओळखीच्या ईमेल वाचकांपुरताच मर्यादित होता. नंतर लोकसत्ता / सकाळ / महाराष्ट्र टाईम्स / बित्तमबातमी अशी वर्तमानपत्रे, अभियंता मित्र / प्रज्ज्योत / कजरी / मायभूमी / पुरुष उवाच / मैत्री / अक्षरसिध्दी / सांज / मिळून साऱ्याजणी / विश्वभ्रमंती अशी मासिके, आणि वॉट्स अप, फेसबुक अशा माध्यमांमुळे परीघ खूप वाढत गेला........ . | याआधी लिहिलेली २ पुस्तके - १) म्हैस आणि २) काही आहे का ? काही आहे का ? हि अमेझॉन वर उपलब्ध आहेत. यांना पण छान प्रतिसाद मिळत आहे. अशाप्रकारे सगळ्यांच्याच सहकार्यामुळे वाचकवर्ग वाढतो आहे आणि माझी लिखाणातून आनंदयात्रा मस्त मजेत सुरु आहे. | माझ्या काही लेखांचं संकलन आता 'हसती खेळती बायको' या पुस्तकात केले आहे. आपल्याला हे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल अशी खात्री वाटते. |
- अभिप्राय जरूर पाठवावा. -सुधीर करंदीकर
Pozdravljeni! Sem Libroamiko, vaš knjižni svetovalec.
Kako vam lahko pomagam?